jaiprabhublog

Friday, 1 November 2013

१ 
रंगमचावर डसतो 
तिच्या आयुष्याला प्रेमभंग
२ 
कावरी-बावरी होत लटकते
रंगमचावर गळ्यात फास घेऊन 
३ 
पडदा पडतो 
४ 
लोक टाळ्या वाजवतात 
बेभान होऊन
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:24 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
विठ्याचे ग्लोबलायजेशन 

१ 
माणसांचा गुता होणाऱ्या जमान्यात 
अगरबती, धूपात 
कॆद झालेला विठ्या ग्लोबल होतो 
त्याच्या देहासह.

२ 
आधुनिक ग्लोबल भक्ताच्या 
बुवाबापुंच्या
गावटी संत महंताच्या
ग्लोबल हाकेला बळी पडतो विठ्या

३
नामदेवाशी बोलणारा
जनाईबरोबर दळण दळणारा
चोख्याची वेदना होणारा विठ्या
तुमचा विठ्या, आमचा विठ्या
सर्वाचा विठ्या
धावणारा
दळणारा
नाचणारा
एका क्लिकमध्ये पावणारा
आकर्षक
आणि कुठल्याही पोजमधला
विठ्या केवळ एका क्लिकवर
सोबत लुटा अध्यत्माबरोबर मनोरंजनाचा निखळ आनंद
देशी
विदेशी मॉडेलसोबत.

४
भक्तांनी विठ्याला बाजारात आणले
तंत्रज्ञानाचे वेड लावून
त्याला
मातीतून
माणसातून उठवले
आणि माती केली त्याच्या संसाराची
बेदखल करून रुक्मीणीला
कायमचे त्याच्या आयुष्यातून .
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:23 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
माणसांचा रोबो केल्या जाणाऱ्या काळात 
जगाचा विचार करता करता स्वताचा विचार करण्याचे कवी विसरून जातो. रोबोच होतो कवी. रोबो कविता लिहतो माणसांवर. केवढा विरोधाभास आहे कवीच्या जगण्यातला. माणसावर कविता लिहणारया या रोबोला सागायला हवे की तू कवी नाही, माणूस तर नाहीच नाही… तू आहेस रोबो… गर्दीतला आणि गर्दीबाहेरसुद्धा. माणसांचा रोबो केल्या जाणाऱ्या काळात
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:22 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
भडवे होणाऱ्या काळातील नोंदी 

१ 
आई-बहीण 
बायको -मुलगी 
आणि 
कोणतीही स्त्री समोर असताना 
आपण गर्भातून जल्माला आलो 
ही जाणीव गळून पडते नाळेसारखी 
हॉस्पिटलमधल्या बकेटमध्ये
त्यामुळे
मातीचा, आईचा, बहिणीचा अर्थ
कळत नसावा.
२
बहीण मुनी असते
ती बदनाम होते
किवा
बायको शीला असू शकते
शीलाची जवानी
कित्येक जणाच्या पायातून पुढे सरकते
डीजेच्या ठेक्यावर
आपल्या देखत

३
मुलगी कुणाचीही असू शकते
पण सातच्या आत घरात
ही घोषणा फतवा होतो तिच्यासाठी
पुन्हा
झंडू बॉम
आयटम बॉम्ब
करता येते तिला
हे समजल्यानंतर
चार -पाच चवल्यावर
मस्तवाल होण्याऱ्या कळपानंची जवानी
अधिकच मस्त होते
आपण भडवे होतो
त्या काळात
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:21 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Sunday, 12 May 2013

kavita bapachi


द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 07:32 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Sunday, 24 February 2013


ती करपत राहाते 
उन्हा तान्हात, थंडी-वाऱ्यात 
कधी जात्याखालच पीठ होत 
कधी भट्टीतील वीट होत 
बारादिस बारोमास.  
पदर खोचून कंबरेला 
काढते गाळ विहिरीतला 
ग्यासबती डोक्यावर घेऊन 
जळते इनामदाराच्या वरातीला 
भांगलते शेत सावकाराचे 
काढते शेताबरोबर 
पोराच्याही आयुष्यतले तण    
शेणातील कीडा काय शेणातच राहात नाही म्हणत 
करते वजाबाकी काट्याची 
शाबूत ठेवतमाणुसकी 
बेरीज करून माणसाची. 
काळ बदलला 
बदलली आईची गोष्टसुद्धा 
आई 
पोराच्या वाढीसाठी ग्राईप वाटर  
संतुलित आरोग्याच्या सॊदर्यासाठी  
सव्हलोन -संतूरचा ब्रान्ड होते 
उज्ज्वल भवितव्यासाठी  
टुशनचा खाजगी क्लास होते  
पोरं शिकतात 
शिकून शहाणी होतात 
गुगलवर सर्च करत 
आई समजून घेतात 
आई भारावते 
हरखून जाते 
आमच्या वाटयाला नाही 
निदान पोराच्या वाट्याला तरी आलं म्हणत 
भरल्या संसारातून आई जगाचा निरोप घेते 
पोरं कोसळतात 
वादळात उन्मळून पडलेल्या झाडांसारखी 
तू भरल्या संसारातून निघून गेल्यास 
आज बारा दिवस होत आहेत 
ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो 
चिन्या,जम्बो,पिल्या ....  
शिवाय 
माफक व योएग्य दरात पिझ्हा मिळेल 
बदलत्या काळात बदलत जाते आईचे वर्तमान 
आई  पिझ्हाची ओर्डेर होते 
मेल्यानंतरही पोराच्या धद्यासाठी 
आई चार बाय पाचचा कॉलम होते 
जयप्रभू कांबळे 







द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 06:18 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 18 February 2013


  • १
    पाढरा भुजंग
    गावाला डसला
    बोक्यानी भोगला
    गाव सारा
    २
    गटातटानी केली
    गावाची माती
    जातीची राख
    कपाळाला
    ३
    तुक्याचाही असा
    कसा गेला तोल
    त्याचेही बोल
    कल्याण मुंबई
    ४
    साईचेही आता
    झोकात रिमीक्स
    नाचतो विठ्ठल
    डॉल्बीवर
    ५
    पायालाही आता
    लागेना माती
    सिमेटाची पोती
    गावभर
    ५
    जगण्याचे सूत्र
    वेटिंग वेटिंग
    कटीगांची झुंड
    उभी दारात
    ६
    भाकरीच्या वाट्याला
    आला दुष्काळ
    सोकावला काळ
    पिझ्झा बर्गरचा
    ७
    जगण्याची झाली
    खाणावळ आता
    मरणाची पार्टी
    रोजच
    ८
    देहाची गरज
    पुरवी मॉल
    गरिबाचे हाल
    जागो जागी
    ९
    मॉलबरा मॉलबरा
    श्रीपाद वल्लभ मॉलबरा


    JayPraabhu Kamble
    1
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 09:14 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

jay

Blog Archive

  • ▼  2020 (1)
    • ▼  July (1)
      • तुकाराम बोल्होबा आंबिलेच्या कवितेची गोष्ट...
  • ►  2013 (11)
    • ►  November (6)
    • ►  May (1)
    • ►  February (2)
    • ►  January (2)
  • ►  2012 (1)
    • ►  December (1)

jayprabhu

My photo
कवेतलं आभाळ
i am man
View my complete profile
Watermark theme. Powered by Blogger.