jaiprabhublog

Friday, 1 November 2013

आईच्या आश्रयस्थानाविषयी 

आई 
उन्हात तापलेली 
आपण पदराखाली 
आई 
अंधारात 
आपण उजेडाखाली 
आई 
दगडावरचा घन झालेली 
आपण झोपलेलो असतो झाडाखाली
आई
पुस्तकाचे दुकान झालेली
आपण होतो सुधारित
आई
परड्याअंगाच्या खोपीत
तीन भांड्यासह,ताटी वाटीसह
आपण घरात अबाधित
आई
वृद्धाआश्रमात
पोराचा फोटो कवटाळत
आपण बायको पोरात
मस्त
आई
कोर्टात
तिचा लढा पोरासुनेशी
आपण आरोपीच्या पिजर्यात
आई
सम्शानात चितेवर
आपण सोफासेटवर बिनधास्त
ऊन
रस्ता
अंधार
खोप
वृद्धाआश्रम
कोर्ट
सम्शान
हीच आईची आश्रयस्थाने झाली आहेत का ?
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:26 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
निष्ठावंत पुरोगामी 

पगाराचे काय झाले 
विचारताच 
बायकोला दिली कानपाठात ठोकून 
मुलीकडून आवळून घेतला 
गळ्याला टाय 
धाकलीने बाधल्या 
बुटाच्या नाड्या 
बहिणीला दिली वार्निग 
सातच्या आत घरात
आणि
काढला फतवा
म्ह्तारीची बडबड चालणार नाही
तसाच सामील झालो गर्दीत
गाठले स्टेशन बस्लो गाडीत
वाचले फुले
डोक्यात ठेवली ताराबाई शिंदे
फिरवली नजर आंबेडकरांवर
दिले लेक्चर
बीएच्या वर्गात
सत्यवर्तन करणारे कोणाला म्हणावे
दुपारी सामील झालो
महिलामुक्तीमोर्च्यात
नोदवला निषेध प्रतिगाम्याचा
उगाळली कलमे राज्य घटनेतली
कपाळाला गंध लावल्यासारखी
पुढे दिला विश्वास
बायानो सावध राहा
रात्र वेऱ्याची आहे
रडल्या महिला
रडली वेदना
आणि पडला शिक्का
स्त्रीवादी विचारवंत
झालो निष्ठावंत पुरोगामी
पेपरात छापून येण्यापुरता
jayprabhu kamble
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:25 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
१ 
रंगमचावर डसतो 
तिच्या आयुष्याला प्रेमभंग
२ 
कावरी-बावरी होत लटकते
रंगमचावर गळ्यात फास घेऊन 
३ 
पडदा पडतो 
४ 
लोक टाळ्या वाजवतात 
बेभान होऊन
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:24 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
विठ्याचे ग्लोबलायजेशन 

१ 
माणसांचा गुता होणाऱ्या जमान्यात 
अगरबती, धूपात 
कॆद झालेला विठ्या ग्लोबल होतो 
त्याच्या देहासह.

२ 
आधुनिक ग्लोबल भक्ताच्या 
बुवाबापुंच्या
गावटी संत महंताच्या
ग्लोबल हाकेला बळी पडतो विठ्या

३
नामदेवाशी बोलणारा
जनाईबरोबर दळण दळणारा
चोख्याची वेदना होणारा विठ्या
तुमचा विठ्या, आमचा विठ्या
सर्वाचा विठ्या
धावणारा
दळणारा
नाचणारा
एका क्लिकमध्ये पावणारा
आकर्षक
आणि कुठल्याही पोजमधला
विठ्या केवळ एका क्लिकवर
सोबत लुटा अध्यत्माबरोबर मनोरंजनाचा निखळ आनंद
देशी
विदेशी मॉडेलसोबत.

४
भक्तांनी विठ्याला बाजारात आणले
तंत्रज्ञानाचे वेड लावून
त्याला
मातीतून
माणसातून उठवले
आणि माती केली त्याच्या संसाराची
बेदखल करून रुक्मीणीला
कायमचे त्याच्या आयुष्यातून .
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:23 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
माणसांचा रोबो केल्या जाणाऱ्या काळात 
जगाचा विचार करता करता स्वताचा विचार करण्याचे कवी विसरून जातो. रोबोच होतो कवी. रोबो कविता लिहतो माणसांवर. केवढा विरोधाभास आहे कवीच्या जगण्यातला. माणसावर कविता लिहणारया या रोबोला सागायला हवे की तू कवी नाही, माणूस तर नाहीच नाही… तू आहेस रोबो… गर्दीतला आणि गर्दीबाहेरसुद्धा. माणसांचा रोबो केल्या जाणाऱ्या काळात
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:22 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
भडवे होणाऱ्या काळातील नोंदी 

१ 
आई-बहीण 
बायको -मुलगी 
आणि 
कोणतीही स्त्री समोर असताना 
आपण गर्भातून जल्माला आलो 
ही जाणीव गळून पडते नाळेसारखी 
हॉस्पिटलमधल्या बकेटमध्ये
त्यामुळे
मातीचा, आईचा, बहिणीचा अर्थ
कळत नसावा.
२
बहीण मुनी असते
ती बदनाम होते
किवा
बायको शीला असू शकते
शीलाची जवानी
कित्येक जणाच्या पायातून पुढे सरकते
डीजेच्या ठेक्यावर
आपल्या देखत

३
मुलगी कुणाचीही असू शकते
पण सातच्या आत घरात
ही घोषणा फतवा होतो तिच्यासाठी
पुन्हा
झंडू बॉम
आयटम बॉम्ब
करता येते तिला
हे समजल्यानंतर
चार -पाच चवल्यावर
मस्तवाल होण्याऱ्या कळपानंची जवानी
अधिकच मस्त होते
आपण भडवे होतो
त्या काळात
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 08:21 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Sunday, 12 May 2013

kavita bapachi


द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 07:32 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Sunday, 24 February 2013


ती करपत राहाते 
उन्हा तान्हात, थंडी-वाऱ्यात 
कधी जात्याखालच पीठ होत 
कधी भट्टीतील वीट होत 
बारादिस बारोमास.  
पदर खोचून कंबरेला 
काढते गाळ विहिरीतला 
ग्यासबती डोक्यावर घेऊन 
जळते इनामदाराच्या वरातीला 
भांगलते शेत सावकाराचे 
काढते शेताबरोबर 
पोराच्याही आयुष्यतले तण    
शेणातील कीडा काय शेणातच राहात नाही म्हणत 
करते वजाबाकी काट्याची 
शाबूत ठेवतमाणुसकी 
बेरीज करून माणसाची. 
काळ बदलला 
बदलली आईची गोष्टसुद्धा 
आई 
पोराच्या वाढीसाठी ग्राईप वाटर  
संतुलित आरोग्याच्या सॊदर्यासाठी  
सव्हलोन -संतूरचा ब्रान्ड होते 
उज्ज्वल भवितव्यासाठी  
टुशनचा खाजगी क्लास होते  
पोरं शिकतात 
शिकून शहाणी होतात 
गुगलवर सर्च करत 
आई समजून घेतात 
आई भारावते 
हरखून जाते 
आमच्या वाटयाला नाही 
निदान पोराच्या वाट्याला तरी आलं म्हणत 
भरल्या संसारातून आई जगाचा निरोप घेते 
पोरं कोसळतात 
वादळात उन्मळून पडलेल्या झाडांसारखी 
तू भरल्या संसारातून निघून गेल्यास 
आज बारा दिवस होत आहेत 
ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो 
चिन्या,जम्बो,पिल्या ....  
शिवाय 
माफक व योएग्य दरात पिझ्हा मिळेल 
बदलत्या काळात बदलत जाते आईचे वर्तमान 
आई  पिझ्हाची ओर्डेर होते 
मेल्यानंतरही पोराच्या धद्यासाठी 
आई चार बाय पाचचा कॉलम होते 
जयप्रभू कांबळे 







द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 06:18 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 18 February 2013


  • १
    पाढरा भुजंग
    गावाला डसला
    बोक्यानी भोगला
    गाव सारा
    २
    गटातटानी केली
    गावाची माती
    जातीची राख
    कपाळाला
    ३
    तुक्याचाही असा
    कसा गेला तोल
    त्याचेही बोल
    कल्याण मुंबई
    ४
    साईचेही आता
    झोकात रिमीक्स
    नाचतो विठ्ठल
    डॉल्बीवर
    ५
    पायालाही आता
    लागेना माती
    सिमेटाची पोती
    गावभर
    ५
    जगण्याचे सूत्र
    वेटिंग वेटिंग
    कटीगांची झुंड
    उभी दारात
    ६
    भाकरीच्या वाट्याला
    आला दुष्काळ
    सोकावला काळ
    पिझ्झा बर्गरचा
    ७
    जगण्याची झाली
    खाणावळ आता
    मरणाची पार्टी
    रोजच
    ८
    देहाची गरज
    पुरवी मॉल
    गरिबाचे हाल
    जागो जागी
    ९
    मॉलबरा मॉलबरा
    श्रीपाद वल्लभ मॉलबरा


    JayPraabhu Kamble
    1
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 09:14 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Sunday, 27 January 2013


      १
पिसाटाची झडप                 
संस्कृती गडप 
रक्ताळले पार 
 अंधारात 
       २
हातात टाळ 
गळ्यात माळ 
कडोमाची add 
 रानोमाळ 
        ३
विट्यालाही नाद 
लागला सीडीचा 
त्याचेही दार 
बंद आता 
      ४
अभगाचा गळा 
डोल्बीने चिरला 
गावही रंगला 
दाडीयात 
     ५
देहाच्या वराती 
बोळात सजल्या 
नासवल्या पोरी 
रातोराती 
६
भगार जगणे 
भगारली रात 
वासनेचे गीत 
गिधाडे गाती 
७
पिसाटले थवे 
बोकाळल्या झुडी 
माणुसकीची मुंडी 
मुळगळली  
  जयप्रभू कांबळे 

द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 10:38 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Friday, 25 January 2013

परिघावरचा ग्लोकल माणूस....!: "दाखल्यावर प्रकाश" :वस्तुस्थिती आणि राजकारण

परिघावरचा ग्लोकल माणूस....!: "दाखल्यावर प्रकाश" :वस्तुस्थिती आणि राजकारण: प्रकाश आंबेडकर यांनी काही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख नको अशी भूमिका घेतली आहे त्यातील उपभाग म्हणजे एक,...
द्वारा पोस्ट केलेले कवेतलं आभाळ येथे 11:13 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

jay

Blog Archive

  • ►  2020 (1)
    • ►  July (1)
  • ▼  2013 (11)
    • ▼  November (6)
      • आईच्या आश्रयस्थानाविषयी आई उन्हात तापलेली आपण पदर...
      • निष्ठावंत पुरोगामी पगाराचे काय झाले विचारताच बायक...
      • १ रंगमचावर डसतो तिच्या आयुष्याला प्रेमभंग२ कावरी-...
      • विठ्याचे ग्लोबलायजेशन १ माणसांचा गुता होणाऱ्या जम...
      • माणसांचा रोबो केल्या जाणाऱ्या काळात जगाचा विचार क...
      • भडवे होणाऱ्या काळातील नोंदी १ आई-बहीण बायको -मुलगी 
    • ►  May (1)
      • kavita bapachi
    • ►  February (2)
      • ती करपत राहाते  उन्हा तान्हात, थंडी-वाऱ्यात  ...
    • ►  January (2)
      •       १ पिसाटाची झडप                  संस्कृती ...
      • परिघावरचा ग्लोकल माणूस....!: "दाखल्यावर प्रकाश" :व...
  • ►  2012 (1)
    • ►  December (1)

jayprabhu

My photo
कवेतलं आभाळ
i am man
View my complete profile
Watermark theme. Powered by Blogger.