Friday 1 November 2013

आईच्या आश्रयस्थानाविषयी 

आई 
उन्हात तापलेली 
आपण पदराखाली 
आई 
अंधारात 
आपण उजेडाखाली 
आई 
दगडावरचा घन झालेली 
आपण झोपलेलो असतो झाडाखाली
आई
पुस्तकाचे दुकान झालेली
आपण होतो सुधारित
आई
परड्याअंगाच्या खोपीत
तीन भांड्यासह,ताटी वाटीसह
आपण घरात अबाधित
आई
वृद्धाआश्रमात
पोराचा फोटो कवटाळत
आपण बायको पोरात
मस्त
आई
कोर्टात
तिचा लढा पोरासुनेशी
आपण आरोपीच्या पिजर्यात
आई
सम्शानात चितेवर
आपण सोफासेटवर बिनधास्त
ऊन
रस्ता
अंधार
खोप
वृद्धाआश्रम
कोर्ट
सम्शान
हीच आईची आश्रयस्थाने झाली आहेत का ?
निष्ठावंत पुरोगामी 

पगाराचे काय झाले 
विचारताच 
बायकोला दिली कानपाठात ठोकून 
मुलीकडून आवळून घेतला 
गळ्याला टाय 
धाकलीने बाधल्या 
बुटाच्या नाड्या 
बहिणीला दिली वार्निग 
सातच्या आत घरात
आणि
काढला फतवा
म्ह्तारीची बडबड चालणार नाही
तसाच सामील झालो गर्दीत
गाठले स्टेशन बस्लो गाडीत
वाचले फुले
डोक्यात ठेवली ताराबाई शिंदे
फिरवली नजर आंबेडकरांवर
दिले लेक्चर
बीएच्या वर्गात
सत्यवर्तन करणारे कोणाला म्हणावे
दुपारी सामील झालो
महिलामुक्तीमोर्च्यात
नोदवला निषेध प्रतिगाम्याचा
उगाळली कलमे राज्य घटनेतली
कपाळाला गंध लावल्यासारखी
पुढे दिला विश्वास
बायानो सावध राहा
रात्र वेऱ्याची आहे
रडल्या महिला
रडली वेदना
आणि पडला शिक्का
स्त्रीवादी विचारवंत
झालो निष्ठावंत पुरोगामी
पेपरात छापून येण्यापुरता
jayprabhu kamble
१ 
रंगमचावर डसतो 
तिच्या आयुष्याला प्रेमभंग
२ 
कावरी-बावरी होत लटकते
रंगमचावर गळ्यात फास घेऊन 
३ 
पडदा पडतो 
४ 
लोक टाळ्या वाजवतात 
बेभान होऊन
विठ्याचे ग्लोबलायजेशन 

१ 
माणसांचा गुता होणाऱ्या जमान्यात 
अगरबती, धूपात 
कॆद झालेला विठ्या ग्लोबल होतो 
त्याच्या देहासह.

२ 
आधुनिक ग्लोबल भक्ताच्या 
बुवाबापुंच्या
गावटी संत महंताच्या
ग्लोबल हाकेला बळी पडतो विठ्या


नामदेवाशी बोलणारा
जनाईबरोबर दळण दळणारा
चोख्याची वेदना होणारा विठ्या
तुमचा विठ्या, आमचा विठ्या
सर्वाचा विठ्या
धावणारा
दळणारा
नाचणारा
एका क्लिकमध्ये पावणारा
आकर्षक
आणि कुठल्याही पोजमधला
विठ्या केवळ एका क्लिकवर
सोबत लुटा अध्यत्माबरोबर मनोरंजनाचा निखळ आनंद
देशी
विदेशी मॉडेलसोबत.


भक्तांनी विठ्याला बाजारात आणले
तंत्रज्ञानाचे वेड लावून
त्याला
मातीतून
माणसातून उठवले
आणि माती केली त्याच्या संसाराची
बेदखल करून रुक्मीणीला
कायमचे त्याच्या आयुष्यातून .
माणसांचा रोबो केल्या जाणाऱ्या काळात 
जगाचा विचार करता करता स्वताचा विचार करण्याचे कवी विसरून जातो. रोबोच होतो कवी. रोबो कविता लिहतो माणसांवर. केवढा विरोधाभास आहे कवीच्या जगण्यातला. माणसावर कविता लिहणारया या रोबोला सागायला हवे की तू कवी नाही, माणूस तर नाहीच नाही… तू आहेस रोबो… गर्दीतला आणि गर्दीबाहेरसुद्धा. माणसांचा रोबो केल्या जाणाऱ्या काळात
भडवे होणाऱ्या काळातील नोंदी 

१ 
आई-बहीण 
बायको -मुलगी 
आणि 
कोणतीही स्त्री समोर असताना 
आपण गर्भातून जल्माला आलो 
ही जाणीव गळून पडते नाळेसारखी 
हॉस्पिटलमधल्या बकेटमध्ये
त्यामुळे
मातीचा, आईचा, बहिणीचा अर्थ
कळत नसावा.

बहीण मुनी असते
ती बदनाम होते
किवा
बायको शीला असू शकते
शीलाची जवानी
कित्येक जणाच्या पायातून पुढे सरकते
डीजेच्या ठेक्यावर
आपल्या देखत


मुलगी कुणाचीही असू शकते
पण सातच्या आत घरात
ही घोषणा फतवा होतो तिच्यासाठी
पुन्हा
झंडू बॉम
आयटम बॉम्ब
करता येते तिला
हे समजल्यानंतर
चार -पाच चवल्यावर
मस्तवाल होण्याऱ्या कळपानंची जवानी
अधिकच मस्त होते
आपण भडवे होतो
त्या काळात