Friday 1 November 2013

विठ्याचे ग्लोबलायजेशन 

१ 
माणसांचा गुता होणाऱ्या जमान्यात 
अगरबती, धूपात 
कॆद झालेला विठ्या ग्लोबल होतो 
त्याच्या देहासह.

२ 
आधुनिक ग्लोबल भक्ताच्या 
बुवाबापुंच्या
गावटी संत महंताच्या
ग्लोबल हाकेला बळी पडतो विठ्या


नामदेवाशी बोलणारा
जनाईबरोबर दळण दळणारा
चोख्याची वेदना होणारा विठ्या
तुमचा विठ्या, आमचा विठ्या
सर्वाचा विठ्या
धावणारा
दळणारा
नाचणारा
एका क्लिकमध्ये पावणारा
आकर्षक
आणि कुठल्याही पोजमधला
विठ्या केवळ एका क्लिकवर
सोबत लुटा अध्यत्माबरोबर मनोरंजनाचा निखळ आनंद
देशी
विदेशी मॉडेलसोबत.


भक्तांनी विठ्याला बाजारात आणले
तंत्रज्ञानाचे वेड लावून
त्याला
मातीतून
माणसातून उठवले
आणि माती केली त्याच्या संसाराची
बेदखल करून रुक्मीणीला
कायमचे त्याच्या आयुष्यातून .

No comments:

Post a Comment